हिवाळ्यातील आहारात करा 'या' ७ पौष्टिक फळं आणि भाज्यांचा समावेश

Monika Shinde

फळं आणि भाज्या

हिवाळ्यात आपल्याला अनेक पौष्टिक फळं आणि भाज्या मिळतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. ही फळं आणि भाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि तंदुरुस्ती टिकवून ठेवतात.

पालक

पालकमध्ये प्रथिनं, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतात आणि आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतात.

बीनस

बीनस मध्ये प्रथिनं, फायबर्स आणि व्हिटॅमिन B असतात. ते सूप किंवा सॅलड मध्ये घालून चवदार आणि आरोग्यदायी असते.

रताळे

रताळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन A आणि पोटॅशियम असतात, जे शरीराला स्थिर ऊर्जा देतात आणि हिवाळ्यात खाण्यास उत्तम असतात.

गाजर

गाजरमध्ये व्हिटॅमिन A, C आणि फायबर्स असतात. ते कमी कॅलोरी असले तरी अत्यंत पौष्टिक असतात, त्यामुळे ते हिवाळ्यात खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

मेथी

मेथी पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिनं असतात. याचा वापर तुम्ही स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ बनवण्यासाठी करू शकता.

सफरचंद

सफरचंद पेक्टिन, प्रथिनं, व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेलं असतं. ते आपले आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

पिअर

पिअरमध्ये व्हिटॅमिन C, E आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हिवाळ्यात त्याचा वापर केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोग टाळता येतात.

कासवू साडीसाठी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन्स!

आणखी वाचा