Anushka Tapshalkar
जिथे खरा ट्रस्ट असतो तिथे अभिनय, लपवाछपवी किंवा परफेक्ट दिसण्याचा ताण नसतो. पार्टनर तुमच्या स्वभावासहित तुमचा स्वीकार करतो.
जुने जखमा, भीती किंवा दुखऱ्या आठवणी बोलून दाखवायला सुरक्षित वाटत असेल तर नात्यातली विश्वासाची पातळी मजबूत आहे.
शंका, संशय आणि निगराणी इथे नसते. दोघेही एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर करतात कारण मनात शंका नसते.
कोठे जायचं, कोणाला भेटायचं, काय करायचं हे सांगणारं नातं नव्हे—तर एकमेकांना स्वातंत्र्य देणारं नातं ट्रस्टवर उभं असतं.
पार्टनरचे मित्र असोत किंवा कुटुंब—त्यांच्याविषयी असूया नसून आदर असतो. बाहेरच्या रिलेशनशिप्सना सपोर्ट केला जातो.
दोघेही आपापल्या पद्धतीने योगदान देतात. स्कोर कीपिंग नसतं, फक्त टीमवर्क असतं. हेच विश्वासाची खरी खूण आहे.
तुम्हाला काही त्रास होत असेल तर ते बोलण्याची भीती नसते. मतभेद तुटण्याचं चिन्ह नसून, नातं अधिक समजून घेण्याची संधी असते.
Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar
sakal