Aarti Badade
केस मऊ, चमकदार आणि सिल्की दिसण्यासाठी नियमित हेअर केअर रुटीन फॉलो करणे महत्त्वाचे आहे. केसांच्या प्रकारानुसार योग्य उत्पादने निवडा.
soft silky hair
Sakal
आठवड्यातून साधारण २ वेळा सौम्य शॅम्पू वापरून केस स्वच्छ करा. केस धुताना खूप गरम पाणी वापरणे टाळा.
soft silky hair
Sakal
प्रत्येक वेळी शॅम्पू केल्यानंतर केसांच्या मध्यापासून टोकांपर्यंत कंडिशनर लावा. यामुळे केस अधिक मऊ आणि सहज विंचरता येण्यास मदत होते.
soft silky hair
Sakal
आठवड्यातून एकदा खोबरेल किंवा एरंडेल तेलाने हलक्या हाताने टाळू आणि केसांची मालीश करा. तेल लावल्यानंतर काही वेळाने केस धुवा.
soft silky hair
Sakal
अर्धी वाटी दही + १ चमचा मध एकत्र करून केसांना लावा. साधारण २० ते ३० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.
soft silky hair
Sakal
कोरफड जेलमध्ये थोडे खोबरेल तेल मिसळून केसांना लावू शकता. तसेच आळशीच्या बियांपासून तयार केलेले जेल केसांना चमक आणि मऊपणा देण्यास मदत करू शकते.
soft silky hair
Sakal
ओले केस जोरात घासून पुसू नका; त्याऐवजी मऊ सुती कापड किंवा जुना टी-शर्ट वापरा. स्ट्रेटनर, कर्लर आणि हेअर ड्रायरचा अतिरेक टाळा, कारण जास्त उष्णतेमुळे केस कोरडे आणि नाजूक होऊ शकतात.
soft silky hair
Sakal
Honey on Face Benefits
Sakal