मानवी मेंदूच्या ७ विचित्र सवयी कोणत्या?

संतोष कानडे

मेंदू

तुम्हाला माहिती नसेल परंतु मानवी मेंदूला अनेक सवयी असतात. त्यात विचित्र सवयींचाही भरणा असतो.

नकारात्मक गोष्टी

माणसाचा मेंदू हा नकारात्मक गोष्टींकडे आकर्षिला जातो. दहा चांगलया गोष्टींपेक्षा एक वाईट गोष्ट मेंदू बराच काळ लक्षात ठेवतो.

डोअरवे इफेक्ट

आपण एखाद्या खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिथे आपण कशासाठी आलोच, हेच विसरतो. यालाच डोअरवे इफेक्ट म्हणतात.

ब्लाईंड स्पॉट

माणसाच्या डोळ्यासमोर एक ब्लाईंड स्पॉट असतो, तिथे आपल्याला काहीही दिसत नाही. परंतु मेंदू आपल्याला ते जाणवू देत नाही.

काल्पनिक भीती

ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या गोष्टींच्या मेंदू आठवणी तयार करतो आणि त्यामुळे काल्पनिक भीती वाटत रहाते. एखादी खोटी घटनासुद्धा वारंवार ऐकल्याने खरी वाटते.

इयरवर्म

एखादं गाणं किंवा धून डोक्यात सतत वाजत रहाणे याला इयरवर्म असं म्हणतात. एखादं गाणं अर्धवट वाजतं किंवा ऐकलेलं असतं तेव्हा ते सतत डोक्यात घुमत रहातं.

मेंदू गोंधळून जातो

आपल्यासमोर अनेक पर्याय असले की आपण खूश होऊ असं होऊ, असं आपल्याला वाटत असतं. परंतु प्रत्यक्षात मेंदू गोंधळून जातो आणि सहसा निर्णय चुकतो.

विश्रांती

जेव्हा आपण झोपतो तेव्हा मेंदू शरीराला विश्रांती देतो पण दिवसभरातील अनावश्यक माहिती बाहेर काढतो आणि महत्त्वाच्या आठवणी साठवतो.

भारतातील पाच शापित किल्ले... भीतीने उडेल गाळण

<strong>येथे क्लिक करा</strong>