सकाळ डिजिटल टीम
आचार्य चाणक्य सांगतात की आपल्या भविष्यातील योजना इतरांना सांगू नका. यामुळे लोक आपले नुकसान करु शकतात.
आपली आर्थिक स्थिती कोणालाही सांगू नका, कितीही जवळचा व्यक्ती असला तरी. अन्यथा, इतर व्यक्ती आपल्याला धोका देऊ शकतात.
जेव्हा दोन लोकांमधली गोष्ट असते, ती तिसऱ्याला सांगू नका. विश्वास महत्त्वाचा आहे आणि तो तडा जाऊ नये.
प्रेमातील अपशय किंवा कौटुंबिक भांडणं कोणाला सांगू नका. हे खाजगी आहेत आणि इतरांनी त्याचा गैरफायदा घेतला, तर तो आपल्यासाठी हानीकारक होईल.
आपल्या आजाराची माहिती इतरांना सांगू नका. समोरच्याला याचा गैरफायदा घेण्याची संधी मिळू शकते.
आपल्या मानसिक स्थितीबद्दल इतरांना सांगू नका. जास्त इमोशनल असल्यास, लोक आपल्याला आपल्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात.
आपले धार्मिक विश्वास आणि आध्यात्मिक गोष्टी इतरांना उघड करू नका. यामुळे लोक आपल्याला चुकीच्या पद्धतीने प्रभावित करू शकतात.