दिवाळी फराळ! करंजी बनवण्याची अचूक पद्धत अन् फुटू नये म्हणून या महत्वाच्या टिप्स

Aarti Badade

दिवाळीची शान करंजी!

दिवाळी म्हटलं की फराळ आणि फराळात करंजी हवीच! पण तुमची करंजी तेलकट होते, फुटते किंवा मऊ पडते का? काळजी करू नका, या ७ टिप्स फॉलो करा!

Karanji

|

Sakal

सारण थंडच भरा

करंजीचे सारण (स्टफिंग) गरम असताना कणकेत भरू नका. गरम सारणामुळे कणकेचा भाग मऊ होऊन करंजी तेलात फुटण्याची शक्यता असते.

Karanji

|

Sakal

कणकेत 'हे' घाला

कणिक (पीठ) खूप मऊ झाले तर करंजी फुटते, आणि खूप कडक झाले तर व्यवस्थित बंद होत नाही. गरम मोहन (तूप/तेल) किंवा रवा घातल्यास कणिक कुरकुरीत होते.

Karanji

|

Sakal

कडा नीट बंद करा

करंजीच्या कडा नखांनी नव्हे, तर काट्याच्या मागच्या बाजूने किंवा बोटांनी घट्ट दाबा. कडेत हवा आत राहिल्यास ती तेलात फुटते.

Karanji

|

Sakal

तेलाचे योग्य तापमान

जास्त तापलेले तेल करंजीला आतून कच्चे ठेवते. खूप थंड तेल करंजी शोषून घेते. तेलात पिठाचा गोळा टाकून तो वर आल्यास, तेल तळण्यासाठी योग्य समजावे.

Karanji

|

Sakal

करंजी झाकताना काळजी घ्या

करंज्या बनवून झाल्यावर तळण्यापूर्वी त्या कोरड्या सुती कापडाने झाका. दमट कापडाने झाकल्यास ओलावा वाढून कणिक मऊ पडते आणि फुटते.

Karanji

|

Sakal

टीप

एकावेळी तेलात जास्त करंज्या टाकू नका. यामुळे तेलाचे तापमान कमी होऊन त्या फुटतात. मंद ते मध्यम आचेवरच करंज्या सोनेरी होईपर्यंत तळा.

Karanji

|

Sakal

दिवाळी फराळ! तोंडात विरघळणाऱ्या बेसन लाडूची परफेक्ट रेसिपी

Besan Ladoo

|

Sakal

येथे क्लिक करा