Aarti Badade
दिवाळीच्या फराळात बेसन लाडू हा एक महत्त्वाचा आणि आवडता पदार्थ आहे. या खुसखुशीत लाडवांची सोपी रेसिपी पाहूया.
Besan Ladoo
Sakal
४ कप बेसन पीठ, २ कप पिठीसाखर, १ कप साजूक तूप, ऐच्छिक: वेलची पूड, पिस्ता, बदाम.
Besan Ladoo
Sakal
जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा आणि त्यात बेसन पीठ घाला.मंद ते मध्यम आचेवर सतत ढवळत बेसन खमंग वास येईपर्यंत आणि सोनेरी होईपर्यंत भाजा.
Besan Ladoo
Sakal
बेसन भाजले की गॅस बंद करा. टीप- मिश्रण खूप गरम असताना साखर घालू नका, नाहीतर लाडू चिकट होतील.
Besan Ladoo
Sakal
मिश्रण कोमट असताना त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घाला.सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र मिसळून घ्या.
Besan Ladoo
Sakal
मिश्रण कोमट असतानाच लगेच तुमच्या आवडीनुसार गोल लाडू वळवा.तुम्ही लाडवांवर पिस्ता किंवा बदाम लावून सजवू शकता.
Besan Ladoo
Sakal
लाडू पूर्णपणे थंड झाल्यावरच ते हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे ते जास्त दिवस खमंग आणि बरोबर शेपमध्ये राहतील.
Besan Ladoo
Sakal
Sweet Shankarpali
Sakal