Wall Paintings: वास्तुशास्त्रानुसार घरासाठी लावा 'ही' 7 भित्तीचित्रे, जाणून घ्या कोणती

Monika Shinde

शुभ ऊर्जा आकर्षित करण्यासाठी भित्तीचित्रे

वास्तुशास्त्रानुसार योग्य भित्तीचित्रे निवडल्यास घरात सकारात्मकता आणि सौंदर्य दोन्ही येते. जाणून घ्या कोणती चित्रे लाभदायक आहेत.

निसर्गदृश्ये

प्राकृतिक दृश्ये, जसे की हिरवेगार जंगल, नदी, किंवा डोंगर, शांतता आणि प्रसन्नता निर्माण करतात. हे ड्रॉइंग रूमसाठी योग्य ठरते.

उगवत्या सूर्याचे चित्र

घरात उगवत्या सूर्याचे भित्तीचित्र लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि यश वाढते. हे पूर्वेकडील भिंतीसाठी उत्तम मानले जाते.

सात घोड्यांचे चित्र

सात घोड्यांचे चित्र घरात यश, संपत्ती, आणि गतिमानता आणते. हे भिंतीच्या पश्चिम दिशेला ठेवणे फायदेशीर आहे.

पवित्र फुलांचे चित्र

कमळ किंवा मोगऱ्यासारखी फुले शुभ मानली जातात. यामुळे घरात सौंदर्याबरोबरच शांतीचा वास होतो.

भगवान बुद्ध यांचे चित्र

बुद्धांचे भित्तीचित्र लावल्याने मनःशांती आणि समतोलता प्राप्त होते. हे ध्यान कक्ष किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवा.

प्रवाही पाण्याचे चित्र

प्रवाहित पाण्याचे चित्र घरात समृद्धी आणते. मात्र, हे बेडरूममध्ये टाळावे.

कौटुंबिक चित्र

कौटुंबिक चित्रे घरातील आपुलकी आणि एकोप्याला प्रोत्साहन देतात. हे लिव्हिंग रूमसाठी उत्तम असते.

Hand Rings : हाताचे सौंदर्य खुलवणारे नाजूक ७ रिंग्स? कोणते जाणून घ्या

येथे क्लिक करा