सकाळ डिजिटल टीम
गरोदर महिलांना निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. काही भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, पण काही भाज्यांचे अतिप्रमाणात सेवन गरोदरपणात टाळले पाहिजे.
कोबी खाल्ल्याने जंतू आणि कीटकनाशकांच्या धोका निर्माण होऊ शकतात. लेटस मध्ये टोक्सोप्लाज्मोसिस आणि लिस्टीरिया जंतू असतात, जे गरोदर स्त्री आणि बाळासाठी घातक ठरू शकतात.
वांगी जास्त खाल्ल्याने अॅलर्जी होऊ शकते, तसेच पचनशक्ती कमजोर होऊ शकते. पपई खाल्ल्याने मुदतपूर्व डिलिव्हरी होऊ शकते, त्यामुळे गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत पपई टाळावी.
कच्चे स्प्राऊट्स गरोदर स्त्रीसाठी धोकादायक असतात. आलेचा जास्त वापर होऊ नये, कारण गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत आले खाल्ल्याने मिसकॅरेज होऊ शकतो.
कारले जास्त खाल्ल्याने पोटदुखी, अपचन आणि अतिसार होऊ शकतात. गाजराचा अधिक सेवनामुळे स्किन पिवळे होऊ शकते आणि व्हिटॅमिन ए च्या अधिक प्रमाणामुळे बाळाच्या विकासात अडथळा येऊ शकतो.
गरोदरपणात वजन वाढत असेल, तर अनहेल्दी कॅलोरी कमी करा आणि लो कॅलरी पदार्थांचा समावेश करा. ताज्या भाज्या, फळांचे सलाड आणि प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
गरोदर महिलांना आहारामध्ये कमी फॅट, लो कॅलोरी पदार्थ आणि ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा लागतो. नियमितपणे कमी प्रमाणात आहार घेतल्यास वजन नियंत्रणात ठेवता येते.