Aarti Badade
ज्येष्ठमध आयुर्वेदात एक महत्त्वाचे औषध आहे. यामध्ये अँटीबायोटिक्स, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स असतात. याच्या सेवनाने शरीराचे आरोग्य सुधारते.
ज्येष्ठमध पित्तनाशक म्हणून वापरले जाते. याचे सेवन अॅसिडीटीच्या समस्येसाठी फायदेशीर ठरू शकते. मध, तूप आणि आवळ्याच्या पावडर सोबत मिश्रण करून अॅसिडीटीपासून आराम मिळवता येतो.
ज्येष्ठमध अतिसार आणि डायरीया उपचारासाठी गुणकारी आहे. खडीसाखर, जायफळ आणि डाळिंबाच्या सालीचा काढा याच्या सेवनाने आराम मिळतो.
ताप आणि फिव्हरच्या वेळी घरगुती उपाय म्हणून ज्येष्ठमधाचा उपयोग करता येतो. त्यात मनुके, मोहाचे फूल आणि त्रिफळा घालून त्याचे पाणी पिऊन आराम मिळवता येतो.
ज्येष्ठमधात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीबायोटिक गुणधर्म असल्यामुळे सांधिवातामध्ये सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
ज्येष्ठमध घशाच्या खवखवणीवर रामबाण उपाय आहे. सर्दी आणि खोकल्याचा त्रास असताना याचे सेवन करून आराम मिळवता येतो.
ज्येष्ठमध डोळ्यांसाठी टॉनिकप्रमाणे काम करते. याच्या पावडरसोबत त्रिफळाचूर्ण, दूध आणि तूप एकत्र करून दृष्टी सुधारण्यास मदत होते.