तुम्हाला माहीत आहेत का लग्नातील 7 वचने? वाचा आणि नातं समजून घ्या

Monika Shinde

भारतीय विवाह परंपरेत

भारतीय विवाह परंपरेत, सप्तपदीचे सात वचन अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. वर आणि वधू अग्नीला साक्षी ठेवून ही वचने देतात, जी त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात करतात.

पहिले वचन

वर आणि वधू एकमेकांना वचन देतात की ते धर्म, कुटुंब आणि जीवनातील सर्व जबाबदाऱ्या एकत्र पार पाडतील.

दुसरे वचन

दोघंही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ देतील, आधार बनतील, असं वचन देतात.

तिसरे वचन

हे वचन संपत्तीचा योग्य वापर, बचत आणि कुटुंबाची नीट काळजी घेण्याचं वचन आहे.

चौथे वचन

दोघंही एकमेकांप्रती प्रेम, सन्मान आणि निष्ठा कायम ठेवण्याचं वचन घेतात.

पाचवे वचन

हे वचन एकमेकांच्या कुटुंबाला स्वीकारण्याचं आणि त्यांचा आदर करण्याचं आहे.

सहावे वचन

या वचनात एकमेकांप्रती प्रेम, विश्वास आणि समर्पण जपण्याचं वचन दिलं जातं.

सातवे वचन

शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं वचन म्हणजे संपूर्ण आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं, कुठल्याही प्रसंगात हात न सोडण्याचं आणि एकमेकांच्या प्रेमात अढळ राहण्याचं वचन असतं.

पुरुषांनी मखाना का खावं? जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे

येथे क्लिक करा