भारताचा इतिहास आणि देशभक्तीची भावना जागवणारी 8 पुस्तके

Anushka Tapshalkar

इंडिया आफ्टर गांधी

रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या या पुस्तकात स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा प्रवास आणि एका लोकशाही राष्ट्रात झालेला परिवर्तनाचा आढावा दिलेला आहे.

India After Gandhi | sakal

द डिस्कव्हरी ऑफ इंडिया

भारताच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची सखोल ओळख या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळते. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

The Discovery Of India | sakal

ट्रेन टू पाकिस्तान

खुशवंत सिंग यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात तुम्हाला फाळणीच्या काळातील प्रेम आणि शोकांतिकेची हृदयस्पर्शी कथा वाचायला मिळते.

Train To Pakistan | sakal

फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट

लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील नाट्यमय घटनांचे वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.

Freedom At Midnight | sakal

माझी सत्याच्या प्रयोगांची कहाणी

महात्मा गांधींचे प्रेरणादायी आत्मचरित्र आणि त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान या पुस्तकात वाचायला मिळते.

The Story Of My Experiments With Truth | sakal

वी, द पीपल

नानी पालखीवाला यांनी भारताच्या संविधानाची आणि त्यातील लोकशाही मूल्यांची सखोल ओळख या पुस्तकात करुन दिली आहे.

We, The People | sakal

भगतसिंग: व्हाय आय अ‍ॅम अ‍ॅथिस्ट

भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या विचारांचा आणि क्रांतिकारी भावनांचा परिचय या पुस्तकात होतो.

Bhagat Singh: Why I Am An Atheist | sakal

द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन

अमर्त्य सेन यांच्या या पुस्तकात भारताच्या वैविध्यपूर्ण आणि बौद्धिक परंपरेला उजाळा देणारे विचारप्रवर्तक लेख आहेत.

The Argumentative Indian | sakal

लष्करात जायचंय? लागा तयारीला! 'एसपीआय'ची प्रवेश प्रक्रिया सुरू

SPI Recruitment | Sakal
आणखी वाचा