Anushka Tapshalkar
जर आपल्याला वैयक्तिक वाढ करायची असेल, ज्ञान मिळवायचे असेल किंवा प्रेरणा हवी असेल, तर ही आयुष्य बदलणारी ८ पुस्तकं प्रत्येकाने नक्की वाचणं गरजेचं आहे.
ही कथा एका मेंढपाळच्या त्याच्या स्वप्नाच्या शोधात असल्याबद्दलची आहे. ही कथा आपल्याला नशीब, चिकाटी आणि अंतःकरणाचे अनुसरण करण्याच्या जादूबद्दल शिकवण देते.
मानवतेच्या उत्क्रांतीचा प्रवास, जगावरील आपला प्रभाव आणि आपल्या अस्तित्वाला आकार देणार्या क्लिष्ट शक्तींचा शोध घेणे याबद्दल या पुस्तकात सांगितले आहे.
एकहार्ट टोलेची कायापालट करणारी कलाकृती, "The Power of Now," भूतकाळातील पश्चात्ताप आणि भविष्यातील चिंतांपासून मुक्त होण्याचं आणि वर्तमानाकाळाची सखोल मुक्ती स्वीकारण्यासाठीचं एक आमंत्रणच आहे.
"Beloved" गुलामगिरीच्या अतिशय दुःखद परिणांचा शोध घेते आणि ओळख, आघात व भूतकाळातील दुःखद प्रसंगांच्या प्रभावाच्या किचकट स्थितीचा शोध घेते.
रॉबर्ट ग्रीन यांच्या 'मास्टरी' या विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या पुस्तकात वाचकांना त्यांची खरी क्षमता उलगडण्याच्या आणि यशाची विलक्षण शिखरे गाठण्याच्या दिशेने परिवर्तनशील प्रवासावर नेलं आहे.
"मेक योर बेड" मध्ये अॅडमिरल विल्यम एच. मॅक्रेव्हन एक सखोल शिकवण देतात की सोप्या कृती आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतात.
होलोकॉस्टमधून वाचलेल्या व्यक्तीच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक अत्यंत कठीण परिस्थितीतही जीवनातील उद्दिष्टांच्या शोधात उतरते.
वाचकांना एका कालातीत मार्गदर्शकाची ओळख करून दिली जाते जी परस्पर संबंध आणि प्रभावी संप्रेषणाच्या कलेचा शोध घेते, पिढ्यानपिढ्या प्रासंगिक असलेल्या अंतर्दृष्टी प्रदान करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.