Anushka Tapshalkar
वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या बजेट सादरीकरणाच्या वेळी विविध रंगांच्या साड्या नेसून एक खास संदेश दिला आहे. प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ असतो, जो त्यांच्या बजेट भाषणाशी संबंधित असतो.
2019 चे बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी ही गुलाबी रंगाची साडी नेसली होती. हा रंग स्थिरता आणि गांभीर्याचे प्रतीक मानला जातो.
2020मध्ये बजेट सादर करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पिवळी साडी नेसली होती. हा रंग उत्साह आणि उर्जेचे प्रतीक आहे आणि शुभ कार्यासाठी शुभ मानला जातो.
2021साली निर्मला सीतारामन यांनी लाल आणि पांढरी मिक्स साडी नेसली होती. लाल रंग शक्ती आणि संकल्पाचा प्रतीक आहे.
निर्मला सीतारामन यांनी 2022च्या बजेटसाठी तपकिरी (ब्राउन) रंगाची बोमकाई साडी नेसली होती. ओडिशातील प्रसिद्ध हस्तकलेचे दर्शन घडवणाऱ्या या साडीवर जरिचे काम होते.
2023च्या बजेटसाठी निर्मला सीतारामन यांनी नेसलेली लाल आणि काळ्या रंगाची साडी शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक दर्शवते.
अंतरिम बजेट २०२४ साठी निर्मला सीतारामन यांनी निळ्या रंगाची लीफ प्रिंट साडी नेसली होती. निळा रंग शांतता, स्थिरता, प्रेरणा, ज्ञान आणि विश्वासाचे प्रतीक आहे.
2024च्या बजेटसाठी निर्मला सीतारामन यांनी लीफ प्रिंट बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट चेक्स्ड साडी नेसली होती. क्रीम आणि ऑफ-व्हाइट रंग समृद्धी आणि कोमलतेचे प्रतीक आहे, तर मॅजेंटा रंग सार्वत्रिक सौहार्द आणि भावनिक संतुलन दर्शवतो.
निर्मला सीतारमण यांनी बजेट 2025 सादर करण्यासाठी एक खास साडी परिधान केली. ही साडी मधुबनी कलेला समर्पित असून, पद्मश्री पुरस्कार विजेती दुलारी देवी यांच्यापासून भेट म्हणून मिळाली आहे.
निर्मला सीतारामन यांच्या साड्यांचे रंग हे केवळ फॅशन स्टेटमेंट नसून त्यांच्या आर्थिक धोरणांशी आणि सामाजिक संदेशांशी जुळणारे आहेत.