सकाळ डिजिटल टीम
निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करण्यासाठी एक खास साडी परिधान केली. ही साडी मधुबनी कलेला समर्पित असून, पद्मश्री पुरस्कार विजेती दुलारी देवी यांच्यापासून भेट म्हणून मिळाली आहे.
दुलारी देवी 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्या. त्या मधुबनी कलेच्या एक विशेष कलेच्या शिल्पकार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेव्हा बिहारमधील मिथिला कला संस्थेत क्रेडिट आउटरीच कार्यकमासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली.
निर्मला सीतारमण आणि दुलारी देवी यांच्यात मधुबनी कलेविषयी संवाद झाला आणि त्यात परस्पर करण्यात आला.
दुलारी देवी यांनी निर्मला सीतारमण यांना एक खास मधुबनी कलेवर आधारित साडी भेट दिली आणि बजेट सादरीकरणासाठी साडी परिधान करण्याची विनंती केली.
निर्मला सीतारमण यांनी दुलारी देवींच्या कलेचा आदर म्हणून त्यांची साडी बजेट सादर करताना परिधान केली.
निर्मला सीतारमण यांच्या या कृतीने मधुबनी कलेला आणि बिहारच्या सांस्कृतिक वारशाला महत्व दिले.