हिमोग्लोबिन कमी असण्याची 'ही' 8 लक्षणे दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

हिमोग्लोबिन म्हणजे काय?

हिमोग्लोबिन हे रक्तातील एक प्रथिन आहे जे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. याची कमतरता झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच 'ॲनिमिया' होतो.

Symptoms of low hemoglobin

|

sakal

सततचा थकवा आणि अशक्तपणा

पुरेशी झोप घेऊनही जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल किंवा थोडे काम केल्यावरही गळून गेल्यासारखे वाटत असेल, तर हे रक्ताच्या कमतरतेचे प्रमुख लक्षण असू शकते.

Symptoms of low hemoglobin

|

sakal

त्वचा आणि नखे निस्तेज पडणे

हिमोग्लोबिन कमी असल्यास चेहरा, डोळ्यांच्या आतील भाग आणि नखे फिकट किंवा पांढरी दिसू लागतात. रक्तातील लाल पेशींच्या कमतरतेमुळे त्वचेचा नैसर्गिक गुलाबी रंग जाऊन ती पिवळसर दिसते.

Symptoms of low hemoglobin

|

sakal

श्वास घेण्यास त्रास आणि धाप लागणे

शरीरातील अवयवांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे थोडे चालल्यास किंवा पायऱ्या चढल्यास लगेच धाप लागते. हे हृदय आणि फुफ्फुसांवर येणाऱ्या तणावाचे संकेत आहेत.

Symptoms of low hemoglobin

|

sakal

चक्कर येणे आणि हात-पाय गार पडणे

मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे सतत चक्कर येणे किंवा डोकेदुखी जाणवते. तसेच रक्ताभिसरण नीट न झाल्यामुळे हात आणि पाय नेहमी थंड पडतात.

Symptoms of low hemoglobin

|

Sakal

हृदयाचे ठोके वाढणे

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला जास्त वेगाने रक्त पंप करावे लागते. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात किंवा अचानक वाढल्यासारखे जाणवतात.

Symptoms of low hemoglobin

|

Sakal

केस गळणे आणि ठिसूळ नखे

केसांच्या मुळांना पोषण न मिळाल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते. तसेच नखे कमकुवत होऊन वारंवार तुटतात. ही लक्षणे दिसल्यास त्वरित 'CBC' रक्ताची चाचणी करून घ्यावी.

Symptoms of low hemoglobin

|

Sakal

दारू प्यायल्याने शरीरातील 'हा' भाग सर्वात आधी होतो खराब!

Alcohol damage liver

|

sakal

येथे क्लिक