Anushka Tapshalkar
भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत असल्यामुळे नागरी संरक्षणाचे सराव सुरू असून, नागरिकांना ब्लॅकआउट किंवा संघर्षासारख्या परिस्थितीची तयारी करण्यास सांगितले जात आहे.
कॅनमध्ये उपलब्ध होणारे अन्न, सुका मेवा, ओट्स आणि जास्त काळ टिकून राहतील असे अन्नपदार्थ साठवून ठेवा.
कोरडा खाऊ जसेकी चिवडा, डाळी, शेंगदाणे, हरभरा, फळे यांसारखे उर्जादायी अन्नपदार्थ उपयुक्त ठरतात.
बॉटलमधील पाणी किंवा पाणी शुद्ध करणाऱ्या टॅबलेट्स जवळ ठेवा.
बँडेज, अँटीसेप्टिक वाइप्स, वेदनाशामक, आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, घरात आजारी व्यक्ती असतील तर त्यांची २-३ महिने पुरतील अशी औषधे साठवून ठेवा.
साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, सॅनिटरी नॅपकिन्स यांसारख्या वस्तू विसरू नका.
टॉर्च, अतिरिक्त बॅटऱ्या, बॅटरीवर चालणारा रेडिओ महत्त्वाचे.
पाना, प्लायर, हातोडी यांसारखे दुरुस्तीचे टूल्स गरजेचे ठरू शकतात.
डिजिटल व्यवहार बंद पडल्यास रोख रक्कम आणि डॉक्युमेंट्स महत्त्वाचे ठरतात. तुमचे व तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधारकार्ड, पॅनकार्ड सोबत बाळगा.