Anushka Tapshalkar
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चर्चेत आलेल्या आयएफएस अधिकाऱ्यांविषयी जाणून घ्या…
विक्रम मिस्री यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९६४ रोजी श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे झाला.
श्रीनगरमधील बर्न हॉल स्कूल आणि डीएव्ही स्कूलमधून शिक्षण घेतले. पुढे ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्येही शिक्षण झाले.
दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी घेतली. त्यानंतर जमशेदपूरच्या एक्सएलआरआयमधून एमबीए केला.
प्रारंभी जाहिरात क्षेत्रात काम केले. त्यानंतर यूपीएससीची तयारी करत १९८९ मध्ये IFS अधिकारी झाले.
१९९७ मध्ये पीएम गुजराल, २०१२ मध्ये पीएम मनमोहन सिंग आणि नंतर पीएम नरेंद्र मोदींचे प्रायव्हेट सचिव झाले.
स्पेन (२०१४), म्यानमार (२०१६) आणि चीन (२०१९) मध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले.
भारत-चीन तणावाच्या काळात बीजिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
२८ जून २०२४ रोजी भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाली.
अलीकडेच ‘ऑपरेशन सिंदूर’चे पुरावे सादर करताना त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.