गॅस सिलेंडर जास्त दिवस चालवायचाय? ‘हे’ ८ किचन हॅक्स ठरतील उपयोगी

Anushka Tapshalkar

सद्य स्थिती

सध्या पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे भारतात काही ठिकाणी एलपीजी सिलिंडरची टंचाई आणि बुकिंग वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गॅसची बचत करणे अधिक महत्त्वाचे ठरते.

भिजवण्याची सवय लावा

डाळ, तांदूळ किंवा कडधान्ये स्वयंपाकापूर्वी सुमारे ३० मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे दाणे मऊ होतात आणि शिजायला कमी वेळ लागतो. यामुळे २०–२५% गॅसची बचत होऊ शकते.

झाकण ठेवून शिजवा

भाजी, रस्सा किंवा डाळ शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा. उष्णता आणि वाफ आत राहिल्याने पदार्थ लवकर शिजतो आणि गॅस कमी लागतो.

पाण्याचे योग्य प्रमाण वापरा

भाजी किंवा डाळ शिजवताना गरजेपुरतेच पाणी वापरा. जास्त पाणी उकळायला जास्त वेळ आणि गॅस लागतो.

प्रेशर कुकरचा वापर करा

शक्य तिथे प्रेशर कुकर वापरा. वाफेच्या दाबामुळे पदार्थ लवकर शिजतात आणि गॅसची मोठ्या प्रमाणात बचत होते.

मंद आचेचा नियम पाळा

पदार्थाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. मोठ्या आचेवर ठेवले तर गॅस वाया जातो.

आधी तयारी, मग गॅस

भाजी चिरणे, सोलणे किंवा इतर तयारी आधी करून ठेवा. सर्व तयारी झाल्यावरच गॅस पेटवा, त्यामुळे वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात.

भांडी कोरडी ठेवा

गॅसवर ठेवण्यापूर्वी भांडे खालीून पुसून कोरडे करा. ओले भांडे गरम होण्यासाठी जास्त वेळ आणि गॅस लागतो.

फ्रीजमधील पदार्थ आधी बाहेर काढा

फ्रीजमधील पदार्थ थेट गॅसवर गरम करू नका. आधी त्यांना रूम टेंपरेचरला येऊ द्या, मग गरम केल्यास गॅस कमी लागतो.

घरात सिलेंडर नसेल तरी घाबरू नका; जेवण बनवण्यासाठी वापरा 'हे' 6 स्मार्ट पर्याय!

6 easy alternatives to cooking food at home during LPG shortage

|

sakal

आणखी वाचा