सकाळ डिजिटल टीम
मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळून तयार केलेला फेसपॅक त्वचेला थंडावा देतो आणि अतिरिक्त तेल काढून टाकतो.
लिंबामधील अॅसिडिटी आणि मुलतानी मातीचे क्ले गुणधर्म त्वचा टाईट करतात आणि ऑयल कंट्रोल करतात.
टमाट्यामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळवतात आणि माती अतिरिक्त तेल दूर करते.
काकडीचा थंडावा आणि मुलतानी मातीची शोषण क्षमता तेलकटपणा त्वरित कमी करतात.
दहीमधील लॅक्टिक अॅसिड त्वचा साफ करतं आणि माती तेल शोषते – स्किन सॉफ्ट व ऑइल-फ्री राहते.
आलोवेराचा थंडावा आणि मातीचा ड्रायिंग इफेक्ट – पिंपल्स आणि ऑयली स्किनवर उत्तम उपाय.
बेसन स्क्रबिंग करतं, हळद अँटीबॅक्टेरियल आहे आणि माती तेल शोषते. पिंपल्सवर उत्तम उपाय!
मुलतानी माती त्वचेतील तेल नियंत्रित करते, मुरुमं कमी करते आणि त्वचेला ताजेतवाने बनवते. रोज वापरून फरक जाणवा!