सकाळ डिजिटल टीम
३-४ शिळ्या चपात्या, २ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी,१/२ टीस्पून जिरे,८-१० कढीपत्ता,२-३ हिरव्या मिरच्या (चिरून),१/४ टीस्पून हळद,मीठ चवीनुसार,१ टेबलस्पून साखर (ऐच्छिक),शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर
शिळ्या चपात्या लहान तुकड्यांमध्ये फाडून मिक्सरमध्ये घालून थोडं दरडं कुटून घ्या. खूप बारीक नको.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाका. मोहरी तडतडल्यावर मिरच्या घाला.
फोडणीत हळद घालून एक-दोन मिनिटं परतवा. शेंगदाणे घालून कुरकुरीत होईपर्यंत परता.
तयार केलेली चपातीची पूड कढईत घालून चांगलं परतवा. मध्यम आचेवर हलवत राहा.
मीठ आणि थोडीशी साखर घालून सर्व घटक एकत्र करा. चव चेक करा.
शेवटी खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. व्यवस्थित मिक्स करा.
गरम गरम किंवा थंड चिवडा नाश्त्यासाठी तयार आहे! चहा बरोबर मस्त लागतो.