Pranali Kodre
भारतीय क्रिकेटसाठी रविवारचा दिवस म्हणजेच ८ नोव्हेंबर खास राहिला नाही.
याच दिवशी भारताच्या तीन संघांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.
भारताचे पुरुष आणि महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. पुरुष संघ कसोटी मालिका खेळत आहे, तर महिला संघ वनडे मालिकेत खेळत आहे.
रविवारी भारतीय पुरुष संघाला ऍडलेड कसोटीत रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
रविवारीच भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १२२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
याशिवाय १९ वर्षांखालील भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध रविवारी १९ वर्षांखालील आशिया कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला.
मात्र १९ वर्षांखालील भारतीय संघालाही अंतिम सामन्यात रविवारी ५९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.