Pranali Kodre
नुकताच शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या दिवंगत रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते आणि त्यावेळी विनोद कांबळीची अवस्था पाहून साऱ्यांनाच दुःख झाले होते.
विनोदने १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १०४ वन डे व १७ कसोटी सामने त्याने भारताकडून खेळले.
मात्र, नंतर तो अनेक वादांमध्ये अडकला, तसेच बऱ्याच आजारांचाही सामना त्याला करावा लागला. यादरम्यान, त्याची अवस्था आता बिकट झाली आहे.
त्यामुळे विनोद कांबळीसाठी अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे.
पण, हे माहित आहे का सध्या गंभीर आजारांशी सामना करणारा कांबळी पूर्वी कोट्यवधींची कमाई करायचा. मिडिया रिपोर्ट्स नुसार त्याची कमाई एकेकाळी १ ते १.५ मिलियन डॉलर्स एवढी होती.
मात्र २०२२ मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार त्याची कमाई आता वर्षाला फक्त ४ लाख रुपये आहे.
त्याचे कमाईचे मुख्य स्त्रोत बीसीसीआकडून दिली जाणारी पेन्शन आहे. बीसीसीआयकडून महिन्याला ३० हजार रुपये पेन्शन मिळते.