Anushka Tapshalkar
भारतात सायबर गुन्हे वेगाने वाढत असून मे 2024 पर्यंत 9.5 लाख तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहणे आणि काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा फसवणुकीचा धोका संभवतो.
TRAIच्या नावाने मेसेज येतो की तुमचा नंबर गैरवर्तनात वापरला गेला आहे आणि कनेक्शन बंद होईल. अशा बनावट मेसेजकडे दुर्लक्ष करा.
फसवेखोर CBI अधिकारी असल्याचे भासवतात, कॉल करून धमकी देतात. अशा वेळी कॉल त्वरित कट करा आणि पोलिसांना कळवा.
30-40% हमी परतावा देणाऱ्या स्टॉक गुंतवणुकीच्या ऑफरला बळी पडू नका. सुरुवातीला परतावा देतात, नंतर पैसे घेऊन गायब होतात.
YouTube लाईक करून पैसे कमवा असं सांगितलं जातं. नोंदणीसाठी पैसे घेतले जातात आणि नंतर फसवणूक होते.
महागडे गिफ्ट आले आहे असं सांगून कस्टम ड्युटी मागितली जाते. लोक घाबरून पैसे देतात. ही फसवणूक आहे.
बँक एक्झिक्युटिव्ह बनून OTP, CVV विचारले जातात. ही माहिती कधीही शेअर करू नका.
कोणी तरी सांगतो की चुकून त्याच्या खात्यात पैसे गेले, आणि परत मागतो. खात्री न करता पैसे पाठवू नका.
KYC अपडेट किंवा टॅक्स रिफंडच्या नावाखाली फेक लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक करू नका, ही फसवणूक असते.