UAE चा गोल्डन व्हिसा घ्यायचाय का? तर 'या' 5 गोष्टी आधीच जाणून घ्या!

Monika Shinde

गोल्डन व्हिसा

यूएईमध्ये कायमस्वरूपी राहायचं स्वप्न पाहताय? तर “गोल्डन व्हिसा” ही तुमच्यासाठी खास संधी आहे.

व्हिसा कसा मिळवायचा

पण हा व्हिसा कसा मिळवायचा? कोणती पात्रता लागते? चला, आता ते सविस्तर जाणून घेऊया!

नॉमिनेशनवर आधारित प्रवेश

हा व्हिसा सगळ्यांसाठी खुला नाही. नॉमिनेशन म्हणजे शिफारसीच्या आधारेच ही संधी मिळते. म्हणजेच तुम्हाला कुणीतरी (संस्था, कंपनी किंवा सरकारमान्य संस्था) योग्य उमेदवार म्हणून सुचवायला हवं.

कोण करू शकतो अर्ज?

या व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ठोस कौशल्य असणे गरजेचे आहे. शिक्षक, नर्स, शास्त्रज्ञ, कंटेंट क्रिएटर आणि अगदी याच्ट मालक सुद्धा पात्र ठरू शकतात. पण त्यासाठी त्यांची पात्रता व अनुभव महत्त्वाचा आहे.

फक्त एकदाच पैसे भरायचे

या दीर्घकालीन व्हिसासाठी साधारण AED 100,000 म्हणजेच सुमारे २३ लाख रुपये इतकं एकदाच शुल्क भरावं लागतं. त्यानंतर परत परत रिन्यूअलची गरज नाही.

कुटुंबासाठी फायदे

गोल्डन व्हिसा मिळाल्यावर तुम्ही तुमच्या पत्नीस/पतीस, मुलांना (कोणत्याही वयाच्या अविवाहित मुली आणि २५ वर्षांपर्यंतचे मुले), वृद्ध पालक आणि घरी काम करणाऱ्या नोकरांना सोबत घेऊन जाऊ शकता. त्यासाठी वेगळी गुंतवणूक लागणार नाही.

कडक पात्रता नियम

या व्हिसासाठी फक्त अर्ज करणे पुरेसे नाही. शुद्ध पोलीस रेकॉर्ड, विशिष्ट कौशल्य, आणि अधिकार प्राप्त संस्थेची नॉमिनेशन ही सर्व गोष्टी पूर्ण कराव्या लागतात.

व्यायामानंतर आहार घेणं का गरजेचं असतं?

येथे क्लिक करा