Anushka Tapshalkar
व्हिडिओ गेम्समधील टास्क्स आणि पझल्स मुलांना लॉजिकल थिंकिंग आणि निर्णय घेण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्यास मदत करतात.
मुलांना गेमचे नियम, पात्र, आणि लेव्हल्स लक्षात ठेवावी लागतात, ज्यामुळे त्यांच्या स्मरणशणक्तीमध्ये वाढ होते.
क्रिएटिव्ह गेम्स, जसे की बिल्डिंग किंवा डिझायनिंग गेम्स, मुलांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देतात.
गेमिंग करताना हात व डोळ्यांचा योग्य ताळमेळ बसवावा लागतो, ज्यामुळे त्यांचे कोऑर्डिनेशन स्किल्स सुधारतात.
काही गेम्समध्ये एकाचवेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते, ज्यामुळे मुलांची मल्टीटास्किंग क्षमता सुधारते.
मल्टीप्लेयर गेम्समुळे मुलांमध्ये टीमवर्क, कम्युनिकेशन, आणि सहकार्याचे गुण विकसित होतात.
फास्ट-पेस्ड गेम्समुळे मुलं जलद निर्णय घेण्यात कुशल होतात आणि त्यांच्या रिॲक्शन टाईममध्ये सुधारणा होते.
गेममधील आव्हाने आणि अपयश स्वीकारून पुढे जाण्याची सवय मुलांचे धैर्यआणि चिकाटी वाढवते.