Anushka Tapshalkar
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. लहान मुलंही फोन चालवण्यात निष्णात झाली आहेत.
लहान वयात मोबाइल वापरामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मोबाइल वापराबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
बिल गेट्स यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलांना १४ वर्षांपूर्वी स्वतःचा सेलफोन वापरण्याची परवानगी दिली नव्हती.
ते म्हणाले, “१४ वर्षांपर्यंत आम्ही त्यांचा स्क्रीनटाईम ठरवलेला होता आणि त्यांना फोन फक्त होमवर्क किंवा अभ्यासासाठीच दिला जात असे.”
बिल गेट्स यांच्या मते, जेवणाच्या टेबलवर मुलांना फोन ठेवण्याची परवानगी असू नये.
2016 मधील एका अहवालानुसार, भारतात मुलांना पहिल्यांदा स्मार्टफोन मिळण्याचे सरासरी वय १०.३ वर्षे आहे.
बिल गेट्स यांचे तीन मुलं (२०, १७ आणि १४ वर्षांचे) असून त्यापैकी कोणाकडेही iPhone नव्हता.