Aarti Badade
थकवा, स्नायूंमध्ये पेटके येतायत? शरीरात मॅग्नेशियमची कमतरता तर नाही ना? जाणून घ्या या खनिजाचे महत्त्व...
Magnesium Deficiency
Sakal
शरीराच्या योग्य कार्यासाठी मॅग्नेशियम हे महत्त्वाचे खनिज आहे. त्याची पुरेशी मात्रा शरीराच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Magnesium Deficiency
Sakal
मॅग्नेशियम कमी झाल्यास सुरुवातीला थकवा, अशक्तपणा, भूक कमी लागणे आणि स्नायूंमध्ये पेटके किंवा ताण जाणवू शकतो.
Magnesium Deficiency
Sakal
मॅग्नेशियमची कमतरता जास्त झाल्यास नसांवर, स्नायूंवर आणि हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. गंभीर परिस्थितीत झटके किंवा हृदयाचे ठोके अनियमित होण्यासारख्या समस्या दिसू शकतात.
Magnesium Deficiency
Sakal
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे थेट कॅन्सर होतो, असे सध्या ठामपणे म्हणता येत नाही. काही संशोधनात मॅग्नेशियमची कमी पातळी आणि कॅन्सरच्या धोक्यातील संभाव्य संबंध दिसून आले आहेत; मात्र याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.
Magnesium Deficiency
Sakal
मॅग्नेशियमची गरज पूर्ण करण्यासाठी आहारात बदाम, पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, भोपळ्याच्या बिया आणि तीळ यांचा समावेश करू शकता.
Magnesium Deficiency
Sakal
राजमा, हरभरा, बाजरी आणि नाचणी यांसारख्या पदार्थांमध्येही मॅग्नेशियम आढळते. त्यामुळे रोजच्या आहारात विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
Magnesium Deficiency
Sakal
मॅग्नेशियम मिळवण्यासाठी डार्क चॉकलेटचाही आहारात मर्यादित प्रमाणात समावेश करता येऊ शकतो. मात्र, कोणतीही कमतरता असल्याचा संशय असल्यास स्वतःहून सप्लिमेंट्स घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Magnesium Deficiency
Sakal
80s Makeup look Trend
Sakal