80च्या दशकातील मेकअप आठवतोय? असा होता तेव्हाचा बोल्ड लूक!

Aarti Badade

८०च्या दशकातील मेकअप आठवतोय?

बोल्ड रंग, गडद ब्लश आणि चमकदार ओठ... १९८० च्या दशकातील मेकअप स्टाइल आजही फॅशनप्रेमींना आकर्षित करते!

80s Makeup look Trend

|

Sakal

‘More is More’ हा होता मेकअपचा फंडा!

नैसर्गिक आणि साध्या लूकपेक्षा त्या काळात प्रयोगशील आणि उठावदार मेकअपला अधिक पसंती होती. रंगीत आयशॅडो आणि बोल्ड लिपस्टिक हा लूकचा खास भाग होता.

80s Makeup look Trend

|

Sakal

डोळ्यांवर असायचे निऑन रंग!

इलेक्ट्रिक ब्लू, ब्राइट पर्पल, हॉट पिंक आणि निऑन शेड्सचे आयशॅडो मोठ्या प्रमाणात वापरले जायचे. अनेकदा आयशॅडो भुवयांच्या खालील भागापर्यंत लावला जायचा.

80s Makeup look Trend

|

Sakal

काळ्या मस्करासोबत रंगीत मस्कराही!

फक्त ब्लॅक आयलायनर किंवा मस्करावर ८०च्या दशकातील फॅशन थांबत नव्हती. निळा, जांभळा आणि हिरवा अशा रंगांच्या आयलायनर-मस्करालाही पसंती होती.

80s Makeup look Trend

|

Sakal

गालांवरही हवा होता गडद रंग!

त्या काळात ‘ड्रेपिंग’ मेकअप तंत्र लोकप्रिय होते. डार्क पिंक किंवा प्लम रंगाचा ब्लश गालांच्या हाडांपासून थेट टेम्पल्स आणि हेअरलाइनपर्यंत लावला जायचा.

80s Makeup look Trend

|

Sakal

ओठांसाठी हॉट पिंक आणि फुशिया!

इलेक्ट्रिक पिंक, हॉट फुशिया, गडद लाल आणि बेरी शेड्सच्या लिपस्टिकला मोठी पसंती होती. ओठांना चमक देण्यासाठी शिमर आणि फ्रॉस्टेड फिनिशही लोकप्रिय होती.

80s Makeup look Trend

|

Sakal

बारीक नव्हे, तर जाड भुवयांची फॅशन!

७०च्या दशकातील पातळ भुवयांच्या तुलनेत ८०च्या दशकात नैसर्गिक आणि जाड भुवयांचा ट्रेंड आला. बुशी ब्राऊज या काळातील मेकअपची खास ओळख बनल्या.

80s Makeup look Trend

|

Sakal

मॅट बेसमुळे उठून दिसायचा

त्या काळात त्वचेला एकसारखा आणि मॅट लूक देण्यासाठी फाउंडेशनचा वापर केला जायचा. त्यावर डोळे, गाल आणि ओठांचे बोल्ड रंग अधिक उठून दिसायचे.

80s Makeup look Trend

|

Sakal

८०s मेकअपची खासियत काय?

बोल्ड आयशॅडो, रंगीत आयलायनर, गडद ब्लश, चमकदार लिपस्टिक आणि जाड भुवया... थोडक्यात, १९८० च्या दशकातील मेकअप म्हणजे ‘साधेपणाला बाय-बाय आणि बोल्ड लूकला हाय!’

80s Makeup look Trend

|

Sakal

पुण्यातील हे मंदिर तब्बल २०० वर्षे जुनं! नावामागची कहाणी जाणून घ्या

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

येथे क्लिक करा