8 एमएम, 10 एमएम आणि 12 एमएमच्या सळ्यांमध्ये काय फरक? बांधकामात कुठे होतो वापर?

Varsha Balhe

बांधकाम

बांधकामात वापरल्या जाणाऱ्या या तिन्ही सळ्यांमध्ये जाडी, वजन आणि ताकदीचा फरक असतो. पण कोणती सळी कुठे वापरली जाते आणि तिचं वजन किती असतं? चला, जाणून घेऊया!

HOUSE CONSTRUCTION TIPS

|

esakal

जाड

या सळ्या ८ आणि १० एमएमच्या सळ्यांपेक्षा जाड असतात. त्यांचा वापर बीम, खांब आणि पायामध्ये केला जाऊ शकतो.

HOUSE CONSTRUCTION TIPS

|

esakal

फरक

८ एमएमची सळी सर्वांत पातळ, तर १२ एमएमची सळी सर्वांत जाड असते. १० एमएमची सळी या दोघांच्या मधली असते.

HOUSE CONSTRUCTION TIPS

|

esakal

वजन

सळ्यांच्या व्यासानुसार त्यांचं वजन बदलतं. एका मीटर सळीचं अंदाजे वजन ८ एमएमसाठी ०.३९५ किलो, १० एमएमसाठी ०.६१७ किलो आणि १२ एमएमसाठी ०.८८८ किलो असतं.

HOUSE CONSTRUCTION TIPS

|

esakal

कोणती सळी जास्त मजबूत?

सळीचा व्यास वाढला की तिचं स्टीलचं क्षेत्रफळ वाढतं. त्यामुळे समान दर्जाच्या स्टीलमध्ये जाड सळी अधिक भार पेलू शकते. मात्र, बांधकामासाठी योग्य सळीची निवड आराखड्यानुसारच करावी लागते.

HOUSE CONSTRUCTION TIPS

|

esakal

निवड

घर किती मजली आहे, त्यावर किती भार येणार आहे आणि बांधकामाची रचना कशी आहे, यानुसार सळ्यांची निवड केली जाते. त्यामुळे केवळ जाडी पाहून सळी निवडणं योग्य नाही.

HOUSE CONSTRUCTION TIPS

|

esakal

स्ट्रक्चरल इंजिनिअर

८, १० आणि १२ एमएमच्या सळ्यांमध्ये जाडी, वजन आणि वापराचा फरक असतो. बांधकामात कोणती सळी कुठे वापरायची, हे स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या आराखड्यानुसार ठरतं.

HOUSE CONSTRUCTION TIPS

|

esakal

यंदा पाऊस कमी का पडला? हवामानातील बदलांबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

WHY IS MONSOON RAINFALL LOW?

|

esakal

येथे क्लिक करा