Anushka Tapshalkar
थोड्या थोड्या वेळाने खाल्लेला स्नॅक ऊर्जा टिकवून ठेवायला मदत करतो. यामुळे थकवा कमी होतो आणि तुम्ही सक्रिय राहता येते.
नियमित जेवणांदरम्यान थोड्या थोड्या प्रमाणात स्नॅक्स खाल्ल्याने वारंवार भूक लागणे टाळता येते.
योग्य वेळी नाश्ता केल्याने जेवणाच्या वेळेस अति खाणे टाळता येते, जे पोट गच्च होणे आणि ब्लोटिंगचे मुख्य कारण आहे.
स्नॅक्स खाल्ल्याने किंवा नाश्ता केल्याने वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवता येते आणि काही वेळा वजन कमी करण्यातही मदत होते.
जास्त काळासाठी उपाशी न राहता थोड्य थोड्या वेळाने स्नॅक्स खाल्ले किंवा नाश्ता केल्यास मन प्रसन्न राहते आणि मेंदूच्या कार्यक्षमतेतही सुधारणा होते.
कोणते स्नॅक्स निवडता आणि किती प्रमाणात खाता हे महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या मते, एका नाश्त्यासाठी सुमारे 200 कॅलरीज पुरेशा असतात.
सक्रिय जीवनशैली असलेल्या व्यक्तींनी दिवसभरात 2-3 वेळा नाश्ता करावा, तर कमी शारीरिक हालचाल करणाऱ्यांसाठी एकदाच केलेला नाश्ता पुरेसा असतो.
ताजी फळे, भाज्या, सुका मेवा, बीया यांसारखे कमी कार्बोहायड्रेट्स आणि जास्त फायबरयुक्त पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखर असलेले पदार्थ जसे की चिप्स, डोनट्स यांसारख्या गोष्टी आरोग्यास हानीकारक असतात. तसेच जंक फूड, तेलकट आणि तुपकट पदार्थ टाळावेत.