Anushka Tapshalkar
ओमेगा-3 फॅटी अॅसिडच्या कमतरतेमुळे शरीरात विविध समस्या निर्माण होऊ शकतात. येथे ओमेगा-3 ची कमी असण्याची 8 प्रमुख लक्षणे दिली आहेत
ओमेगा-3 ची कमतरता असल्यास केस गळणे, विरळ होणे आणि कोरडेपणा जाणवू शकतो.
त्वचेला कोरडेपणा, खाज येणे आणि पुरळ होणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि कडकपणा जाणवू शकतो, ज्यामुळे संधिवात होण्याचा धोका वाढतो.
एकाग्रता कमी होणे, विसरण्याची समस्या, तणाव आणि नैराश्य यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ओमेगा-3 ची कमतरता कोलेस्टेरॉल असंतुलन, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवते.
कमजोर आणि लवकर तुटणारी नखे ही ओमेगा-3 च्या कमतरतेचे एक मोठे लक्षण आहे.
वारंवार सर्दी-खोकला, संसर्ग होणे आणि जखमा लवकर न भरणे ओमेगा-3 च्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.
ओमेगा-3 च्या अभावामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे शारीरिक हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो.