Pranali Kodre
तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकणारे ९ विचार जाणून घ्या.
आयुष्य कधीही सोपे नसते, पण तुम्ही तुमच्या समस्या कसं सामोरे जाता, यातून तुमचं खरं सामर्थ्य दिसतं.
तुम्ही प्रत्येकवेळी यशस्वी होणार नाही, पण तुम्ही यशस्वी होण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत रहाणं महत्त्वाचं आहे.
काही लोकं आयुष्यातून निघून जाणं हे तुमच्या वरदान ठरू शकतं.
दुसरे तुमच्याशी कसं वागतात, यातून त्यांचे व्यक्तीमत्त्व दिसून येतं – तुमचं नव्हे.
वेळ चांगली असो की वाईट ती बदलते. बदलांना सामोरे जा.
वेळ सर्वकाही ठीक करेलच असं नाही, पण गोष्टी स्वीकारण्याने त्या ठीक होऊ शकतात.
अपयशातून अनेक गोष्टी शिकता येतात, त्यातूनच यशाचा मार्ग मिळतो. त्यामुळे अपयश ही एक संधी असते.
द्वेष मनात ठेवून फक्त त्रास वाढतो, दुसऱ्यांना क्षमा करा.
भूतकाळ गेलेला असतो आणि भविष्य अजून आलेलं नसतं. त्यामुळे आत्ता आहे तो क्षण जगा.