तळलेलं तेल वारंवार गरम करताय? आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम!

Aarti Badade

विषारी घटकांची निर्मिती

तेल पुन्हा पुन्हा गरम केल्यावर त्यात हानिकारक रसायने आणि टॉक्सिन्स तयार होतात. हे विषारी घटक अन्नाद्वारे शरीरात शिरून आरोग्याला मोठी इजा पोहोचवतात.

Side effects of reheating oil

|

Sakal

कॅन्सरचा वाढता धोका

वारंवार उकळलेल्या तेलातून 'फ्री रॅडिकल्स' निर्माण होतात. हे घटक शरीरातील पेशींना हानी पोहोचवतात, ज्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो.

Side effects of reheating oil

|

Sakal

हृदयावर गंभीर परिणाम

अशा तेलामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

Side effects of reheating oil

|

Sakal

पचनसंस्था बिघडते

पुन्हा गरम केलेले तेल पचायला जळ असते. याच्या सेवनामुळे ॲसिडिटी, गॅस, पोटात जळजळ आणि अपचनाच्या समस्या वारंवार उद्भवू लागतात.

Side effects of reheating oil

|

Sakal

यकृतावर (Liver) येतो ताण

तेलातील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्याचे काम यकृताला करावे लागते. वारंवार अशा तेलाचे सेवन केल्याने यकृताच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

Side effects of reheating oil

|

sakal

रोगप्रतिकारक शक्ती

तेल पुन्हा वापरल्याने त्यातील घटक शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात, ज्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता.

Side effects of reheating oil

|

Sakal

त्वचा आणि केस

या तेलातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे त्वचा कोरडी पडणे, मुरूम येणे आणि अकाली केस गळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

Side effects of reheating oil

|

Sakal

पोषक मूल्ये नष्ट होतात

तेलामध्ये काही नैसर्गिक पोषक घटक असतात, परंतु वारंवार गरम केल्यामुळे ही सर्व जीवनसत्त्वे आणि पोषक मूल्ये पूर्णपणे नष्ट होतात.

Side effects of reheating oil

|

Sakal

सुरक्षिततेचा सोपा मंत्र

आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक वेळी शक्यतो ताजे तेल वापरा. एकदा तळलेले तेल पुन्हा वापरणे टाळणे, हाच निरोगी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

Side effects of reheating oil

|

Sakal

किडनी फेल्युअरचा धोका टाळण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितले रामबाण तोडगे!

Home remedies for kidney stone

|

Sakal

येथे क्लिक करा