शुगर असूनही गोडधोड खाल्लंय? रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे उपाय करा!

Aarti Badade

मधुमेह

दिवाळी म्हटलं की मिठाई आणि गोडधोड आलंच. पण मधुमेह रुग्णांसाठी (हा मोह जीवावर बेतू शकतो आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

Sakal

धोका ओळखणे

अचानक साखर वाढणे हे हृदयासाठी (Heart) खूप धोकादायक आहे.अशा वेळी तात्काळ पाऊले उचलणे गरजेचे असते. घाबरू नका, पण काळजी घ्या!

Sakal

उपवासाचा नियम

मधुमेहावर वेगाने नियंत्रण मिळवण्यासाठी रुग्ण सलग १६ तासांचा उपवास (Fast) करू शकतात.या उपवासात फक्त लिंबूपाणी किंवा ग्रीन टी पिऊ शकता. यामुळे साखर लवकर आटोक्यात येते.

Sakal

लिंबूपाणी आणि पाणी

सकाळी उठल्यावर लिंबूपाणी किंवा गरम पाणी प्यावे.शरीरातील विषारी घटक (Toxins) काढून टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.

Sakal

औषधे वेळेवर घ्या

सण-उत्सवांत खाण्या-पिण्याबाबत काळजी घेऊन तुमची औषधे (Medicines) वेळेवर घ्या.जास्त गोड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा.

Sakal

नियमित व्यायाम

दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम (Exercise) करणे गरजेचे आहे.निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकता.

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय बदल झाल्यास किंवा इन्सुलिनचा डोस (Insulin Dose) घ्यायचा असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही स्व-औषधोपचार (Self-Medication) करू नका.

Sakal

देशी तूप बनवताना हे पानं घाला अन् मिळवा 5 फायदे!

Sakal

येथे क्लिक करा