Aarti Badade
अनेकांना वाटते की पोटदुखी किंवा गॅस हा सामान्य त्रास आहे. पण पित्ताशयातील खड्यांकडे दुर्लक्ष केल्यास तो 'गॅलस्टोन पॅनक्रायटिटीस' सारख्या जीवघेण्या आजारात बदलू शकतो."
Gallstone Pancreatitis symptoms
Sakal
जेव्हा पित्ताशयातील एक छोटा खडा घसरून स्वादुपिंडाच्या पित्त नलिकेत अडकतो, तेव्हा स्वादुपिंडाला सूज येते. यालाच 'गॅलस्टोन पॅनक्रायटिटीस' म्हणतात.
Gallstone Pancreatitis symptoms
sakal
गॅलस्टोन पॅनक्रायटिटीसची सुरुवातीची लक्षणे जेवणानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे, अस्वस्थता किंवा सतत अॅसिडिटी होणे यामुळे रुग्ण याला 'गॅसचा त्रास' समजण्याची चूक करतात.
Gallstone Pancreatitis symptoms
Sakal
पोटाच्या वरच्या भागात वेदना होत असतील आणि त्या पाठीच्या दिशेने सरकत असतील, हे पित्ताशयातील खड्यांचे लक्षण असू शकते. घाम येणे किंवा उलट्या होणे धोक्याचे संकेत आहेत.
Gallstone Pancreatitis symptoms
Sakal
वेळेवर उपचार न मिळाल्यास रक्तदाब कमी होतो, शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावते आणि किडनीसारखे महत्त्वाचे अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवू शकतो.
Gallstone Pancreatitis symptoms
Sakal
जेवणानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे,तेलकट पदार्थ खाल्ल्यावर अॅसिडीटी होणे,पोटाच्या वरील भागात जडपणा जाणवणे, मळमळ किंवा उलट्या होणे,पोटाच्या मध्यभागी किंवा उजवीकडे वेदना, सतत गॅसचा त्रास होणे.
Gallstone Pancreatitis symptoms
Sakal
तज्ज्ञांच्या मते, पित्ताशयातील मोठे खडे जास्त हालचाल करत नाहीत, पण छोटे खडे सहज निसटून नलिकेत अडकतात आणि स्वादुपिंडाला गंभीर संसर्ग पोहचवतात.
Gallstone Pancreatitis symptoms
Sakal
गॅलस्टोनचे निदान करणे अत्यंत सोपे आहे. केवळ एका 'बेसिक अल्ट्रासाऊंड' (USG Abdomen) चाचणीद्वारे पित्ताशयात खडे आहेत की नाही, हे वेळीच समजते.
Gallstone Pancreatitis symptoms
Sakal
पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया ही एक सामान्य प्रक्रिया आहे. खड्यांमुळे होणाऱ्या गुंतागुंतीतून मृत्यू होण्याचे प्रमाण शस्त्रक्रियेच्या धोक्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
Gallstone Pancreatitis symptoms
Sakal
Love Tea but Hate Acidity? Here’s the Perfect Solution!
sakal