Anuradha Vipat
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेग्नन्सीमुळे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही चर्चेत होती.
आता देवोलिनाच्या घरी गुड न्यूज आहे. तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं.
देवोलिनाने मुलाला जन्म दिला आहे.
देवोलीना आणि शाहनवाज यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे.
या गुड न्यूजमुळे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
गोपी बहूच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेली देबोलिना ही बिग बॉसमध्येही झळकली होती.
2022 साली देबोलिना हिने तिचा बॉयऱफ्रेंड आणि जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी लग्न केलं.