Aarti Badade
१८९२ साली दुष्काळात लोकांना रोजगार मिळावा म्हणून आगाखान तृतीय यांनी पॅलेस बांधला, १९ एकर परिसरात वसलेली ही भव्य वास्तू आहे.
१९४२ मध्ये महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई, सरोजिनी नायडू यांना येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
आगाखान हे इस्लामी पंथाचे महान नेता होते, त्यांनी समाजासाठी दुष्काळात धान्यवाटप व लोककल्याण केले.
याच पॅलेसच्या परिसरात कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांच्या समाध्या आहेत.
तीन मजली इमारतीवर पर्शियन व युरोपियन वास्तुकलेचा प्रभाव पाहायला मिळतो.
गांधीजींच्या वास्तव्यावर आधारित माहितीपट, फोटो, मूर्ती, रेकॉर्डेड निवेदन असलेले माहितीपूर्ण संग्रहालय.
१९६९ साली सरकारकडे सुपूर्त केले गेले आणि २००३ मध्ये याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला.
पुण्यातून नगर रस्त्यावर पॅलेस आहे – सकाळी ९ ते संध्याकाळी ५:३० पर्यंत उघडे असते. प्रवेश शुल्क ₹२० आहे.