Shubham Banubakode
इब्राहिम आदिलशहा द्वितीय याने विजापूरजवळ अतिशय सुंदर असे गाव वसवले होते.
हे शहर इतके सुंदर होते की मुल्ला जहुरी या ग्रंथकाराने "शोभेमध्ये हे त्या शहरापुढे चंद्र देखील लज्जायमान होईल" असं त्याचं वर्णन केलं होतं.
इब्राहिम आदिलशाही द्वितीय याने वसवलेल्या या शहराचे नाव होतं "नवरसपूर"
नवरसपूर हे विजापूरजवळ महाराष्ट्राच्या सीमेवर असून अतिशय सुंदर असं गाव होतं.
या गावाचं नाव आदिलशहाने नवरसपूर कशामुळे ठेवले याची एक घटनात्मक नोंद आहे.
ज्या दिवशी या शहराचे काम संपलं त्या दिवशी तोरवी नावाच्या एका इसमाने दारूचा भरलेला शिसा इब्राहिम आदिलशाह द्वितीयसमोर नजर केला होता.
आदिलशाहने हे मद्य प्राशन केले, तेंव्हा त्याला त्याची चव प्रचंड आवडली. तशी त्याने यापूर्वी कधीही बघितली नव्हती.
आदिलशाहने नंतर हे मद्य कुठून आणले विचारलं, तेव्हा ते याच गावात तयार झाल्याचं त्याला सांगण्यात आलं.
हे ऐकून आदिलशहाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मला आज "नवरसीद" म्हणजे नवीन सुखप्राप्ती झाली आहे.
त्यामुळे या नवीन वसवलेल्या शहराचे नाव नवरसपूर ठेवण्यात येत आहे.