सकाळ डिजिटल टीम
बदाम, काजू, अक्रोड, मनुका या सुकामेव्यांमध्ये शारीरिक ताकद आणि हाडांची मजबुती वाढवण्याचे गुण आहेत.
बहुतेक लोक सुकामेवा भिजवून खातात.
सुकामेवा आणि मध एकत्र खाणे अधिक फायदेशीर असते. दोन्हीमध्ये चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
मनुका आणि जर्दाळू मधासोबत खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते.
सुकामेवा आणि मधामुळे पोटॅशियम, फायबर यासारखे पोषक घटक मिळतात.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, आणि फायबर असते. मधासोबत खाल्ल्यास हाडे मजबूत होतात.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात, जे मेंदूसाठी फायदेशीर आहेत. मधासोबत खाल्ल्यास स्मरणशक्ती सुधारते.
काजूमध्ये प्रथिने, जस्त, आणि लोह असतात. मधासोबत खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते.