सकाळ डिजिटल टीम
बाजरीची भाकरी आणि खिचडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ग्लुकोजचा पुरवठा होतो.
रक्तातील शुगरचं प्रमाणही नियंत्रणात राहातो. तसेच वजनही नियंत्रणात राहातं.
पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते.
गव्हाच्या पिठाच्या चपातीच्या तुलनेत बाजरीची भाकरी पचायला हलकी असते.
त्यामुळे अपचनाचे त्रासही होत नाहीत.
शरीराची उत्सर्जन प्रक्रिया सुधारते.
शरीरातील नसा आकुंचन पावणं, सर्दी- थंडी भरणं या अशा समस्याही बाजरीची भाकरी दूर करते.
तेव्हा रोजच्या जेवणात चपातीऐवजी भाकरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो