Sandip Kapde
विदर्भातील एका विश्वासघातकाने औरंगजेबाला शिवाजी महाराजांच्या लपण्याच्या ठिकाणाची माहिती दिली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतो.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नवीन माहिती जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते.
आग्र्यातून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याकडे परतत होते आणि त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मैलगड किल्ल्यावर काही काळ विश्रांती घेतली.
त्या वेळी मैलगड किल्ल्याची जबाबदारी गोसावी नावाच्या किल्लेदाराकडे होती.
मात्र, लोभाच्या मोहात पडून गोसावी किल्लेदाराने शिवाजी महाराज किल्ल्यावर असल्याची गुप्त माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
किल्लेदाराच्या पत्नीला याची कल्पना आल्यानंतर तिने हा कट छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितला.
तिच्या सतर्कतेमुळे महाराजांनी संभाव्य धोका ओळखला आणि वेळीच सावध झाले.
परिस्थितीचे भान ठेवत महाराज योग्य वेळी मैलगड किल्ल्यावरून सुरक्षितपणे बाहेर पडले.
शिवाजी महाराज पुढे कोणत्या मार्गाने गेले याची निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचे इतिहास संशोधक प्रा. डॉ. किशोर वानखडे सांगतात.