त्याने अचानक दोन्ही हाताने माझी छाती पकडली ; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

kimaya narayan

अदिती पोहनकर

अभिनेत्री अदिती पोहनकरने तिला आलेला धक्कादायक अनुभव काही दिवसांपूर्वी शेअर केला. ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

धक्कादायक अनुभव

अदितीने ट्रेनमध्ये प्रवास करत असताना एका अनोळखी मुलाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. ती स्त्रियांच्या डब्यातून प्रवास करत होती. त्यावेळी तिला आलेला हा धक्कादायक अनुभव तिने शेअर केला.

लोकलमध्ये घडलेला प्रकार

अदितीने ट्रेन पकडली आणि तिची ट्रेन निघून गेली. तो माणूस तिथेच जवळ उभा होता. ट्रेन निघाल्यावर त्याने तिच्या छातीला दोन्ही हातानी पकडलं. हा प्रकार पाहून तिला धक्का बसला.

अनोळखी माणूस

तो अनोळखी माणूस तिच्याकडे विचित्र नजरेने बघतोय याची तिला काहीच कल्पना नव्हती. ती लगेच पुढच्या स्टेशनला उतरली आणि पोलीस स्टेशनला गेली. पण पोलिसांनी तिचं म्हणणं ऐकलंच नाही.

पोलिसांनी साथ दिली नाही

तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तिला काहीच मदत करण्याचा प्रयत्न केला नाही.

पोलीस स्टेशन

"अरे ठीक आहे काही जास्त झालं नाही ना ?" असा उलट प्रश्न पोलिसांनी केला त्या मुलाला शोधण्यास नकार दिला. पण तो मुलगा तिथे समोर उभं असल्याचं अदितीने सांगितलं.

दुर्दैवी ! सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या 'या' कलाकारांची कुटूंबाने झटकली जबाबदारी ; मृतदेह सडले तरी

येथे क्लिक करा