kimaya narayan
बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य कायम अस्थिर असतं असं म्हटलं जातं. पण काही असेही कलाकार आहेत ज्यांनी कुटूंबाला स्थैर्य प्राप्त करून दिलं. अखेरच्या काळात ही ते एकाकी होते.
मीना कुमारी अभिनेत्री यांचा कमाल अमरोही यांच्याशी घटस्फोट झाल्यावर त्यांना दारूचं व्यसन लागलं. त्यामुळेच त्या आजारी पडल्या आणि पाकीजा सिनेमाच्या रिलीजनंतर त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनावेळी त्यांचं कुटूंब सोबत नव्हतं इतकंच नाही तर औषधासाठी खर्च करण्यासाठी पैसेही नव्हते.
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री परवीन बाबी आजारपणामुळे सगळ्यांपासून दुरावली. परवीनला स्क्रीनझोफेनिया हा मानसिक आजार झाला. त्यामुळे तिने कुटूंब आणि सगळ्यांशीच संपर्क तोडला. तिचा मृत्यू झाला ही गोष्ट जवळपास तीन दिवसांनी समजली.
मराठी अभिनेते भगवान दादा यांची आर्थिक परिस्थिती ढासळल्यानंतर त्यांच्या कुटूंबाने त्यांची साथ सोडली. त्यांना त्यांची गाडी, जुहूमधील बंगला विकावा लागला. त्यांनाही एकाकी मरण आलं.
बॉलिवूडमधील चरित्र अभिनेत्री अचला सचदेव यांनाही एकाकी मरण आलं. मृत्यूसमयी त्यांची मुलंही त्यांच्याजवळ नव्हती. त्यांना हॉस्पिटलमध्येही भेटण्यास आलं नाही.
पाकिझामध्ये काम करणाऱ्या गीता कपूर यांच्याही कुटूंबाने त्यांची साथ सोडली. वृद्धाश्रमात त्यांचा मृत्यू झाला.
मराठी अभिनेत्री नलिनी जयवंत यांचाही एकाकी मृत्यू झाला. अखेरच्या काळात त्यांनी सगळ्यांशी संबंध तोडले होते. तीन दिवसांनी त्यांच्या मृत्यूविषयी सगळ्यांना समजलं.
अभिनेता राज किरण याच्याही कुटूंबाने आर्थिक अडचणीनंतर त्याची साथ सोडली. त्यानंतर अभिनेता इंडस्ट्रीमधून गायब झाला. अजूनही या अभिनेत्याचा शोध लागला नाही.