Anuradha Vipat
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आरोही अर्थात अभिनेत्री कौमुदी वलोकर ही लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
आकाश चौकासे याच्यासोबत कौमुदी विवाहबद्ध होणार आहे.
त्याआधी कौमुदीच्या सहकलाकारांनी तिचं केळवण केलं.
नुकतचं अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेता अभिषेक देशमुख, अभिनेता सुमंत ठाकरे यांनी कौमुदीचं केळवण केलं आहे
याबाबतची पोस्ट अश्विनीने शेअर केली आहे.
जी मुलगी कायम इतर लोकांना असे सरप्राइज देते तिच्यासाठी प्लॅन करायचे म्हणजे आम्हा सगळ्यांना फार जपून पाऊल टाकावी लागली, असं अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच आमची कौमुदी कायम आनंदी राहावी आणि पुढील आयुष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा असं देखील अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे