Anuradha Vipat
एकेकाळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता.
पण दोघांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही.
आता अनेक वर्षांनंतर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली बेंद्रेसोबत असलेल्या नात्यावर शाहिद याने मौन सोडलं आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहिद याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मुलाखतीत शाहिदला विचारण्यात आलं की,सोनाली बेंद्रेला तू फार आवडायचा यामध्ये काही तथ्य आहे, की तुमच्यात फक्त मैत्री होती
यावर शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘तुम्ही मला आता मला आजोबा म्हणालात आणि आजोबांबद्दल चर्चा करत आहात… ते सर्वकाही आता डिलीट करा… आता आपण मोठे झालो आहोत
आता सोनालीने निर्माता गोल्डी बहल याच्यासोबत लग्न केलं आहे