7 वर्षं नाकारलेलं गाणं शम्मी कपूर यांनी सिनेमात घेताच ठरलं ब्लॉकबस्टर ! तुम्ही ऐकलंय का ?

kimaya narayan

बॉलिवूड आणि शम्मी कपूर

बॉलिवूड आणि शम्मी कपूर यांचा डान्स हे अविभाज्य समीकरण. त्यांची सगळी गाणी गाजली. पण अनेकदा संगीतकारांनी तयार केलेली चाल निर्माते प्रत्येकवेळी स्वीकारतात असं नाही.

नाकरलेलं गाणं

बॉलिवूडमधील ल ; लोकप्रिय गाणं आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हे गाणं तब्बल 7 वेळा निर्मात्यांकडून आणि अभिनेत्यांकडून नाकारण्यात आलं होतं. पण जेव्हा ते एका सिनेमात दिसलं तेव्हा ते गाणं सुपरहिट ठरलं.

इतिहास

1961 मध्ये जब प्यार किसीसे होता है या सिनेमासाठी शंकर जयकिशन या जोडीने हे गाणं तयार केलं. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी हे गाणं गायलंही. पण देव आनंद यांना हे गाणं आवडलं नाही आणि त्यांनी हे सिनेमातून गाणं काढून टाकलं.

निराशा

असं करून हे गाणं अनेक ठिकाणी फिरत राहील. पण पदरी निराशाच आली.

नंतरही नकारच

त्यानंतर 1966 मध्ये हे गाणं राजेंद्र कुमार यांच्या सूरज सिनेमासाठी संगीतकारांनी सुचवलं. पण त्याहीवेळेला या गाण्याला नकार देण्यात आला.

अखेर होकार

अखेर 1968 मध्ये ब्रह्मचारी सिनेमाच्या निर्मितीवेळी शम्मी कपूर यांना शंकर जयकिशन यांनी हे गाणं ऐकवलं. शम्मी यांना हे गाणं खूप आवडलं आणि त्यांनी हे गाणं सिनेमात ठेवण्यास होणार दिला. हे गाणं रिलीज होताच देशभरात गाजलं.

IPL मध्ये RCB पाठोपाठ असा मोठा पराक्रम करणारा KKR हा केवळ दुसरा संघ

येथे क्लिक करा