Apurva Kulkarni
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच होताना दिसते. दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याचा संशय चाहत्यांकडून व्यक्त केला जातो.
दरम्यान या चर्चेला आकाश ठोसरने पुर्णविराम दिला आहे. एका मुलाखतीत त्याने रिलेशनशिपबाबत मौन सोडलं आहे.
रिंकू आणि आकाश सैराट चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध झाले. या चित्रपटानंतर आर्ची आणि परश्याची जोडी प्रचंड गाजली.
दरम्यान एका मुलाखतीत आकाशला रिंकूसोबतच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या अफेरच्या चर्चा खऱ्या आहेत का?
यावर आकाश म्हणाला की, 'असं काही नाही.. आम्ही चांगले मित्र आहोत. जेव्हा भेटतो तेव्हा फिरतो पण आम्ही फक्त आणि फक्त चांगले मित्र आहोत.'
आकाश आणि रिंकू जेव्हा ही भेटतात तेव्हा ते सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.
चाहत्यांना आकाश-रिंकूपेक्षा ते आर्ची-परशा म्हणून खूप आवडतात. आज देखील तितकच्या आवडीने सैराट पिक्चर पाहिला जातो.