Anuradha Vipat
आमिर खान हा त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वक्तव्याने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो.
आता आमिर खान पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्याने चर्चेत आला आहे.
एका मुलाखतीत आमिरने त्याच्या प्रेमाबद्दल सांगताना केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत
आमिरने त्याची पुर्व पत्नी किरण राववरील प्रेम व्यक्त केलं आहे.
आमिर म्हणाला की, “किरण माझ्या आयुष्यात आली आणि आम्ही सुंदर १६ वर्षे एकत्र घालावली. याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान मानतो आणि किरणचे आभार मानू इच्छितो.
पुढे आमिर म्हणाला की,तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. ती एक चांगली व्यक्ती आहे आणि आता एक उत्तम दिग्दर्शिका देखील आहे.
आमिरने या मुलाखतीमध्ये पुढे म्हटलं आहे की, ‘काही लपून राहिलेले नाही. ती खूप चांगली व्यक्ती आहे आणि मी ही फार वाईट नाही, त्यामुळे आमचं नातं चांगलं गेलं