Anuradha Vipat
शिवानी रांगोळने बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
नुकताच विमान प्रवास करताना शिवानीला पाहून विमानातील हवाईसुंदरीने तिच्यासाठी छानसं पत्र लिहिल्याचं पाहायला मिळालं आहे .
हवाईसुंदरी शिवानीसाठी लिहिलं आहे की, “प्रिय मास्तरीणबाई विमानात तुमचं स्वागत करताना मला प्रचंड आनंद होत आहे. माझे पालक तुमचे खूप मोठे चाहते आहेत.
पुढे शिवानीसाठी लिहिलं आहे की,तुमच्याबरोबर प्रवास करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा नक्कीच भेट होईल...
तिने दिलेल्या पत्राचा आणि गिफ्टचा फोटो शेअर करत शिवानी रांगोळने कृतज्ञता व्यक्त करत खास पोस्ट शेअर केली आहे
शिवानीने लिहिलं आहे की, “कितीही वेळा प्रवास केला तरी मुळात मी nervous flyer आहे! अशावेळी एका परक्या देशात असताना जेव्हा आपल्याला ‘मास्तरीणबाई’ म्हणून हाक मारून, आपली काळजी घेतली जाते तेव्हा खूप छान वाटतं!
पुढे शिवानीने लिहिलं आहे की, आपलं काम, जे आपण आयुष्यभरासाठी निवडलं आहे, त्यातून पैशांबरोबर आनंद आणि समाधान मिळणं हे खूप दुर्मिळ असतं. आणि ते आपल्या बाबतीत खरं आहे याचा वारंवार आनंद होतो! माझा प्रवास सुखाचा करण्यासाठी सानिका व विमान कंपनीचे आभार